क.ब.चौ. विद्यापीठात ऑनलाईन प्रश्नमंजूषा स्पर्धेचे आयोजन

जळगाव प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील उपयोजित भूविज्ञान विभाग, भूजल सर्वेक्षण व विकास संस्था  व जियो-फोरम यांच्या संयुक्तपणे, “जलसंवर्धन आणि जल-जन जागृती” या विषयावर राष्ट्रीय स्तरीय ऑनलाइन प्रश्न मंजुषाचे आयोजन केले होते. 

या वर्षी केंद्र शासनाच्या जलशक्ती सप्ताहाचे निमित्त साधून जल-जन जागृती उद्दिष्टे समोर ठेवून, विशेषत: पदव्यी स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी तसेच महाविद्यालयीन तरुणांसाठी”जलसंवर्धन आणि जल-जन जागृती” या विषयावर राष्ट्रीय स्तरीय ऑनलाइन प्रश्न मंजुषा दिनांक ७ ते ९ एप्रिल या कालावधीत आयॊजीत केली होती. या उपक्रमात संपूर्ण महाराष्ट्रातील सुमारे 130 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला अणि उत्कृष्ठ कामगिरी बजावणाऱ्या सर्वाना   ई-प्रशस्तीपत्रक देखील देण्यात आले, असे प्रा. डॉ. स. ना. पाटील (आयोजन समन्वयक तथा विभागप्रमुख) यांनी सांगितले. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. अनुपमा संजय पाटील (वरिष्ठ भूवैज्ञानिक,  जी.एस.डी.ए., जळगाव) आणि प्रा. डॉ. प. स. कुलकर्णी (संस्थापक सचिव, जियो-फोरम,औरंगाबाद) यांनी विशेष सहकार्य केले. या उपक्रमासाठी प्रभारी कुलगुरु प्रा. डॉ. ई. वायुनंदन, प्रभारी प्र-कुलगुरू प्रा. डॉ. बी. व्ही. पवार, तसेच डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, (भा. प्र. से.) तथा निर्देशक, जी.एस.डी.ए., महाराष्ट्र राज्य शासन, पुणे आणि प्राचार्य डॉ. उ. द. कुलकर्णी, सुप्रसिद्ध भू-जलतज्ज्ञ तथा अध्यक्ष, जियो-फोरम, औरंगाबाद यांचे मार्गदर्शन लाभले. 

 

Protected Content