पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांची जिल्हा कारागृहाला अचानक भेट (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । अलीकडे विविध माध्यमांमधून गाजत असलेल्या जळगाव जिल्हा कारागृहाला आज राज्याचे पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी अचानक भेट दिली. पहा याबाबतचा व्हिडीओ वृत्तांत.

जळगावातील कारागृह हे अलीकडेच वादाच्या भोवर्‍यात सापडले आहे. कैद्यांचे पलायन, आपापसातील हाणामारी आदी प्रकारांनी जेल ही नेहमीच चर्चेत असते. या पार्श्‍वभूमिवर, आज सायंकाळी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी कारागृहाला आकस्मीक भेट दिली.

कोणतेही पूर्वनियोजित कारण अथवा पूर्वसूचना न देता पालकमंत्र्यांनी अचानक दिलेल्या या भेटीत कारागृहातील सुविधा आणि गरजांची वस्तुस्थिती त्यावेळी तेथे उपस्थित अधिकारी आणि कर्मचार्‍यांकडून जाणून घेतली . क्षमतेपेक्षा जास्त कैदी ठेवले जाणे आणि अनेक पदे रिक्त असल्याने अधिकारी व कर्मचार्यांच्या अपुर्‍या मनुष्यबळामुळे हे जिल्हा कारागृह नेहमी चर्चेत असते.

दरम्यान, आपण कारागृहातील विविध समस्या जाणून घेतल्या असून त्यांचे निराकरण करण्याचे काम करणार असल्याचे ना. पाटील म्हणाले. विशेष करून येथील कैदी संख्या जास्त असल्याने भुसावळातील कारागृहाची क्षमता वाढवून तेथे कैदी स्थलांतरीत करण्याच्या पर्यायावर विचार असल्याची माहिती ना. पाटील यांनी दिली. राज्य सरकार व जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यातून कारागृहातील विविध प्रलंबीत कामे पार पाडली जातील अशी ग्वाही देखील त्यांनी दिली.

कोरोना साथीच्या प्रसाराच्या पार्शवभूमीवरही पालकमंत्र्यांनी दिलेली ही अचानक भेट महत्वाची समजली जाते आहे . सध्या कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांच्या आधारावर या जिल्हा कारागृहातही व्यवस्था केली गेलेली आहे.

खालील व्हिडीओत पहा ना. पाटील यांच्या भेटीबाबतचा वृत्तांत.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/609472396368789/

Protected Content