नर्मदा ब्राह्मण परिक्रमा करणे गरजेचे – हभप राहूल पवार

yawww

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील दहिगाव येथील हभप राहुल भगवान पवार यांनी अवघ्या नर्मदा ब्राह्मण परिक्रमा करून आपले साध्य पूर्ण केले. त्यामुळे मनशांतीसाठी नर्मदा ब्राह्मण परिक्रमा करणे गरजेचे आहे, असे मत हभप राहूल पवार महाजन यांनी केले.

या माध्यमातून त्यांनी पंचक्रोशीतील भाविक भेटण्यासाठी येत आहे. राहुल महाराज हे वयाच्या अकराव्या वर्षापासून त्यांची सुरुवात धुळे जिल्ह्यातील आर्वी येथील हभप सोपान महाराज यांचेकडून झाली असून त्यांनी अध्यात्म ते का अभ्यास आळंदी येथील वारकरी शिक्षण संस्था सद्गुरु जोग महाराज येथे सन २०१५ पर्यंत शिक्षण घेतले. ते या संस्थेचे माजी विद्यार्थी आहेत शिक्षण घेत असतानाच या संस्थेचे विद्यार्थी राहुल महाराज, दिगंबर महाराज अहिरे, मोहन महाराज सोनवणे यांनी नर्मदा भरण परिक्रमा करण्याचे ठरविले होते. त्यानुसार या तिघांनी एक नोव्हेंबर २०१९ रोजी मध्यप्रदेशातील ओंकारेश्वर येथून नर्मदा परिक्रमेला सुरुवात केली त्यांच्यासोबत धुळे जिल्ह्यातील दिलीप लुले, सुकलाल सपकाळे, प्रकाश लूले 1 नोव्हेंबर ते १६ जानेवारीपर्यंत त्यांनी पायी चालत परिक्रमा पूर्ण केली. दरम्यान बडवानी शूलपाणी झाडी गुजरात राज्यात भू ऋच् येथे समुद्राच्या समारोप केला तेथून परत ओंकारेश्वर येथे येऊन नित्यानंद विधी करून ते आपल्या घरी परतले दरम्यानच्या काळात त्यांचा मुक्काम आश्रम शाळा अनाथ आश्रम किंवा गावागावातील काही भाविकांच्या कडे होता मनाला शांती लाभावी जीवनात आनंद निर्माण व्हावा या दृष्टिकोनातून नर्मदा परिक्रमा परिक्रमा करणे हे फार गरजेचे आहे, असे पवार यांनी सांगितले जीवनाचे सार्थक होते असे ते म्हणाले. नर्मदा ब्रभ्रमण परिक्रमेची त्यांची ही एक वेगळी ओळख आहे.

Protected Content