यावल येथे कुटुंब अर्थसहाय्य योजनेअंतर्गत ३१ लाभार्थ्यांना धनादेशाचे वाटप

yawal news 6

यावल (प्रातिनिधी)। येथील तहसील कार्यालयात तालुक्यातील दारिद्रय रेषेखालील कुटुंब प्रमुखांना राज्य शासनाच्या कुटुंब अर्थसहाय्य योजनेअंतर्गत ३१ लाभार्थ्यांना 6 लाख २० हजार रुपयांचे धनादेश रावेर विधान सभेचे आमदार शिरीषदादा चौधरी यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले.

यावल येथे तहसील कार्यालयात तहसीलदार यांच्या दालनात २७ जानेवारी रोजी राज्य शासनाच्या वतीने दारिद्रय रेषेखालील कुटुंबातील कमावित्या व्यक्तिचे निधन झालेल्या कुटुंबातील प्रमुखाला कुटुंब अर्थसहाय्य योजनेअंतर्गत ३१ कुटुंबाना प्रत्येकी २० हजार रुपयांचे धनादेश देण्यात आले.

यातील लाभार्थ्यांचे नांव पुढीलप्रमाणे मालती किशोर गायकवाड रा. यावल, अनिता संतोष भावसार रा. फैजपुर ता. यावल, फिरोजाबी शेख हमीद मोमीन रा. यावल, आशा रविन्द्र सपकाळे रा. पिंप्री ता. यावल, रंजना रविन्द्र तायडे रा. हिंगोणा ता. यावल, आशा संतोष चंदनशिव रा. फैजपुर, सुंनदा प्रकाश कापडे फैजपुर, इंदु चंदकांत जावळे डोंगर कठोरा ता. यावल, बेबाबाई लक्ष्मण शिंदे कोळवद ता. यावल, मोहीनी श्रीकांत ढाके बामणोद ता. यावल, समाबाई इतबार तडवी कोळवद ता. यावल, रंजना संतोष भिल यावल, ऐनुर सलीम तडवी फैजपुर. नसीम बी. शेख कलीम मन्यार न्हावी प्र. यावल, सलीमा महेमुद खाँ मारूळ ता. यावल, जैनुर कुर्बान तडवी परसाडे ता. यावल, ज्योती सुनिल तेली यावल, सुलभा नेमीदास चोपडे न्हावी प्र. यावल, वत्सला सुभाष सोनवणे रिधुरी ता यावल, ललीता रघुनाथ भिल अट्रावल ता. यावल, प्रतिभा राजु केदारे बामणोद ता. यावल, अलका दिलीप तायडे अंजाळे ता. यावल आदींचा यात समावेश असुन, धनादेश वितरण प्रसंगी तहसीलदार जितेन्द्र कुवर, विभागीय पोलीस अधिकारी नरेन्द्र पिंगळे, संजय गांधी निराधार योजनेचे अव्वल कारकुन प्रफुल्ल कांबळे, महसुलचे मुक्तार तडवी, पंचायत समितीचे सदस्य शेखर सोपान पाटील, काँग्रेसचे शहराध्यक्ष कदीर खान, प. स. सरफराज तडवी यांच्यासह आदी मान्यवर याप्रसंगी उपास्थित होते.

Protected Content