बियाणी मिलीटरी स्कुलचे वार्षिक स्नेहसम्मेलन उत्साहात

bhusawal news 8

भुसावळ प्रतिनिधी । येथील बियाणी मिलीटरी स्कुलचे वार्षिक स्नेहसम्मेलन मंगळवारी पार पडले. यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून मिलीटरी स्टेशनचे कर्नल एस. राजावेलू व हरेंद्र टेकम यांची उपस्थिती होती.

यावेळी बियाणी एज्युकेशन गृपचे अध्यक्ष मनोज बियाणी, सेक्रेटरी संगीता बियाणी, डॉ मुस्कान बियाणी, प्रिंसीपल डी.एम. पाटील, राजीव पारीख, बाळासाहेब सैदाणे प्रविन भराडिया, अयोध्या मंत्री, किरण पारीख, शशी लाहोटी, प्रिंतीपल सोफीया फ्रान्सीस, कांचन जोशी, गोपाळ ठाकूर हे उपस्थित होते.

सुरवातीला बियाणी मिलीटरी स्कुलच्या विदयाथ्र्यांनी मार्च पास केला त्यानंतर कर्नल राजावेलू यांच्या हस्ते मशाल ज्योत पेटवण्यात येऊन कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. गुणवंत विदयार्थ्यांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले. यावेळी बांबूडांन्स, कोळी डान्स, झिंगाट डान्स, सैन्याच्या जिवणावरील ड्रामा, बॉक्सिंग, ज्युडो कराटे, हॉर्स रायडींग, निशानेबाजी, मोटारसायकल पिरॅमिड, मल्लखांब सारखे थरारक दृश्य सादर केले. वंदेमातरमने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. सुत्रसंचालन डी.एम.पाटील व बावीस्कर यांनी केले तर आभार सोनार यांनी मानले. बियाणी एज्युकेशन गृपच्या सर्व शिक्षकांचे सहकार्य लाभले.

Protected Content