माजी सैनिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी मेळाव्याचे आयोजन

जळगाव, प्रतिनिधी । जिल्ह्यातील माजी सैनिक व त्यांच्या अवलंबितांच्या कल्याणविषयक विविध बाबींचे तसेच पेन्शन व इतर अडीअडचणी सोडविण्यासाठी नोव्हेंबर, 2019 मध्ये माजी सैनिक मेळावा आयोजित करण्याचे प्रस्तावित असल्याची माहिती वामन कदम, निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी जळगाव यांनी दिली आहे.

जिल्ह्यातील माजी सैनिक व त्यांचे अवलंबितांनी आपल्याला असलेल्या अडीअडचणी लेखी स्वरुपात जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, जळगाव येथे ऑक्टोबर अखेर पर्यंत द्याव्यात. तसेच स्टेशन हेडक्वार्टर, भुसावळ यांच्या मेळाव्यात ज्या इच्छूक माजीसैनिक व त्यांचे अवलंबितांना उपस्थित रहावयाचे आहे. त्यांनी सुध्दा आपली नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Protected Content