मनसे जिल्हाध्यक्षांची वाढदिवसाला आपतग्रस्तांना मदत

यावल प्रतिनिधी । मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या आदेशाला प्रतिसाद देत पक्षाचे रावेर लोकसभा जिल्हाध्यक्ष चेतन अढळकर यांनी आपला वाढदिवस साजरा न करता याऐवजी कोकणातील पूरग्रस्तांसाठी मदत पाठविली आहे.

सध्या कोकणासह सातारा , सांगली, कोल्हापुर या ठीकाणच्या अतिवृष्ठी व महापुराने थैमान घातले असुन , या अतिवृष्ठीच्या तडाख्याने बाधीत पुरग्रस्तांना जिवनाश्यक वस्तुंची मदत करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या आदेशाला प्रतिसाद देत पक्षाचे रावेर लोकसभा जिल्हाध्यक्ष चेतन अढळकर यांनी आपला वाढदिवस साजरा न करता आपदग्रस्तांना मदत केली.

चेतन अढळकर यांनी जिवनावश्यक वस्तु या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जळगाव जिल्हा सचिव अ‍ॅड जमील देशपांडे यांच्या स्वाधीन करण्यात आले आहे . यावेळी चेतन अढळकर यांच्यासमवेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका उपाध्यक्ष शाम पवार , विभागीय अध्यक्ष आबीद कच्छी , मनसेचे यावल शहरप्रमुख किशोर नन्नवरे , गौरव कोळी , विपुल येवले , प्रतिक येवले, सागर धनगर आदी मनसे पदधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

दरम्यान, चेतन अढळकर यांना वाढदिवसानिमित्त माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष शशांक देशपांडे, माजी उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक प्रा. मुकेश येवले, माजी नगरसेवक व भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष उमेश रेवा फेगडे , भाजपाचे माजी शहराध्यक्ष बाळु फेगडे, अभियंता अनिल पाटील, सामाजीक कार्यकर्ते नितिन सोनार , शशीकांत फेगडे, मराठी अस्मिता प्रतिष्ठानचे सुनिल गावडे , प्रशांत कासार, नितिन बारी, अ‍ॅड देवेन्द्र बाविस्कर , संदीप कुलकर्णी, डॉ. सागर चौधरी, अशोक पाटील, शिवाजी बारी यांच्यासह इतरांनी शुभेच्छा दिल्या.

Protected Content