जळगावात चार घरफोडी करणाऱ्या आरोपींना पोलीस कोठडी

Landmark Supreme Court Judgment Mary Roy v. The State of Kerala 1

जळगाव, प्रतिनिधी । शहरातील सतत घडणाऱ्या घरफोड्यांच्या पार्श्‍वभूमीवर एलसीबीने संशयित आरोपी राजेंद्र ऊर्फ सोपराजा दत्तात्रय गुरव (वय- 30) याला साथीदारासह त्याला अटक करण्यात आली. त्यांच्याकडून गुन्हेशाखेने चार घरफोड्या उघड करुन चार वेगवेगळ्या गुन्ह्यातील 106 ग्रॅम सोने व 429 ग्रॅम चांदीचे दागिने पथकाने हस्तगत केले होते. एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात संशयीतांना सोपवल्यावर त्यांनी दोन घरफोड्यांची आणखी कुबूली दिली असून चार तोळे सोने काढून दिले आहे.

एलसीबीच्या पथकाने गुप्त माहितीनुसार, संशयित राजेंद्र दत्तात्रय गुरव ऊर्फ सोप राजा (वय 30), अजय ऊर्फ शाहरुख हिरालाल पाटील (वय 24, रा. नांद्रा कानळदा) या दोघांना ताब्यात घेतले. पोलिस कोठडीत संशयितांनी एकामागून एक गुन्ह्याची कबुली देत एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील चार मोठ्या घरफोड्यांची कबुली दोघांनी दिली.

पोलिस पथकाने संशयिताकडून 106 ग्रॅम सोने आणि 429 ग्रॅम चांदीचे दागिने हस्तगत केले होते. गुन्हेशाखेने संशयीतांना एमआयडीसी पोलिसांच्या स्वाधीन केल्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी दोघा संशयीतांकडून इतर दोन घरफोड्या उघडकीस आणल्या असून त्यात चार तोळे सोने जप्त करण्यात आले आहे. संशयीतांच्या कोठडीची मुदत संपल्यावर दोघांना न्यायालयात हजर केल्यावर न्या. अक्षी जैन यांच्या न्यायालयाने 4 दिवस अतिरीक्त पोलिस कोठडीची मागणी केली आहे. अटकेतील दोघा संशयीतांनी शहरातील इतर ठिकाणावरही घरफोड्या केल्या असुन रामानंदनगर, जिल्हापेठ पोलिसांनी आपल्या गुन्ह्यात वर्ग करण्यासाठी न्यायालयात अर्ज केला आहे. सरकारपक्षातर्फे ऍड.जी.एम.बारगजे यांनी कामकाज पाहिले.

Protected Content