पहूर येथे वसुंधरा दिनानिमित्त “सेल्फी विथ माय ट्री’ उपक्रम

पहूर, ता. जामनेर प्रतिनिधी । जागतिक वसुंधरा दिनानिमित्त पहूर येथील महात्मा फुले शिक्षण संस्था संचलित सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाच्या इको फ्रेंडली क्लबतर्फे इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी  ‘सेल्फी विथ माय ट्री ‘उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या उपक्रमात रूपाली पाटील, भाग्यश्री कुमावत, जयश्री कोळी, अमृता पगारे, जीवन बनकर ,रोहिणी दांडगे, मेघा जाधव, वेदांत क्षीरसागर ,श्रेया घोंगडे, कांचन लहासे, महेश गोल्हारे, श्रृती कुमावत, प्रथमेश लहासे, अनिकेत जाधव, गौरव शेलवडकर, दिशा घोलप, मोनाली बनकर, गायत्री मोहणे आदी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. झाडा सोबत सेल्फी काढत विद्यार्थ्यांनी त्याच्या संवर्धनाचा संकल्प केला. सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे शिक्षक – पालक संघाचे माजी अध्यक्ष दीपक जाधव यांनी अभिनंदन केले.

चित्रकला स्पर्धा –

वृक्षारोपण करणारी मुले मुली , हिरवा शालू पांघरलेली वसुंधरा ( पृथ्वी ) आणि वृक्षतोडीला विरोध करणारी मुलगी या विषयांवर आधारित चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले . या चित्रकला स्पर्धेत प्रेरणा समाधान उबाळे या विद्यार्थीनीने प्रथम क्रमांक प्राप्त केला . तसेच रुपाली सुरेश पाटील हिने द्वितीय तर नेहा प्रमोद लोहार या विद्यार्थिनीने तृतीय क्रमांक प्राप्त केला . स्पर्धेचे परीक्षण श्रीमती ए. ए . पाटील यांनी केले . त्यांना पालकांचे मार्गदर्शन मिळाले .सदर उपक्रम ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आला.

 

Protected Content