संजय गरुड यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर

शेंदूर्णी प्रतिनिधी । कोरोना महामारीमुळे रक्ताचा तुटवडा भासत असून सरकारने रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे. त्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य व जळगाव जिल्हा नियोजन समिती सदस्य तथा धी शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे चेअरमन व जामनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय गरुड यांच्या ६१ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने (२६ एप्रिल) जामनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, आप्पासाहेब र.भा. गरुड कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना एकक व विद्यार्थी विकास कल्याण विभागाचे वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन येथीलच प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात आले आहे.

राज्यात व जिल्ह्यात कोविड-१९ महामारीने उच्छाद मांडला असून दररोज हजारो रुग्ण कोरोना बाधित होत आहे. या रुग्णांना ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, रेमडेसिव्हर लस याची जशी गरज भासत आहे. त्यापेक्षाही अधिक रक्ताची गरज भासत आहेत. राज्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला असून राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरदचंद्र पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रक्तदान शिबिरे आयोजित करण्याचे आवाहन केले आहे.

तरी  रक्तदात्यांनी जास्तीत जास्त संख्येने रक्तदान करून सहकार्य करावे आपण केलेले रक्तदान रुग्णांसाठी नवसंजीवनी ठरणार आहे त्यासाठी जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदान शिबिरात सहभाग नोंदवून राष्ट्रीय कर्तव्य पार पडावे. रक्तदान शिबिर दिनांक २६/४/२०२१ सोमवारी प्राथमिक आरोग्य केंद्र शेंदूर्णी येथे सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत घेण्यात येईल, रक्तदात्यांनी तोंडाला मास्क लावून यावे व शिबिराचे ठिकाणी शारीरिक अंतर नियमांचे तंतोतंत पालन करावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे. तसेच दादासाहेब संजय रावजी गरुड यांनी जनतेला आवाहन केले आहे की माझ्या जन्मदिनी भेट म्हणून पुष्पगुच्छ शाल हार श्रीफळ हे न आणता आपल्या परिसरातील गरजू व गरीब कुटुंबांना धान्य व जीवन उपयोगी अत्यावश्यक साहित्याचा पुरवठा करून त्यांचा आशीर्वाद घ्यावा हे नम्र आवाहन आहे.

 

Protected Content