फुलगाव रेल्वे गेट बंद केल्यामुळे उडाला गोंधळ

वरणगाव प्रतिनिधी । वरणगाव शहराकडे भुसावळवरून ये-जा करण्यासाठी फुलगाव रेल्वे गेट वरूनच सध्या वाहने सुरू होती. मात्र डीआरएम यांच्या आदेशाने सेक्शन इंजनियर सुबोध कुमार यांनी आज सकाळी 10  वाजता फुलगाव रेल्वे गेट बंद केले. रेल्वे गेट बंद झाल्याने सर्व बसेस् रुग्णवाहिका ट्रक पूर्णतः बंद झाल्याने गोंधळ उडाला होता. ३ तासाने सर्व काही सुरळीत करण्यात आले. 

हि माहिती माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांना मिळाली लगेच माजी नगराध्यक्ष सुनील काळे भाजपा शहराध्यक्ष सुनील माळी, भाजयुमो शहराध्यक्ष संदीप भोई  मिलिंद भैसे फुलगावचे भाजपा नेते राजकुमार चौधरी, भाजयुमोचे सिद्धांत चौधरी, माजी उप  सरपंच शेख सईद यांनी फुलगाव रेल्वे गेट वर धाव घेतली. बंद केलेले रेल्वे गेट सुरु करा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी माजी मंत्री संजय सावकारे, खासदार रक्षाताई खडसे यांना मोबाईलवरून बंद केलेल्या रेल्वे गेटची माहिती देण्यात आली. रेल्वे प्रशासनाने बंद केलेले रेल्वे गेट उघडण्यास नकार दिला. त्यामुळे वातावरण तापले अखेर माजी मंत्री संजय सावकारे  व खासदार रक्षाताई खडसे यांनी डी आर एम यांना फुलगाव रेल्वे गेट सुरू ठेवण्याच्या सूचना केल्या.

रेल्वे गेट बंद केल्यामुळे सर्व बस रुग्णवाहिका ह्या 5 किलो मिटर फेऱ्याने साईबाबा मंदिराच्या जवळून ये-जा  होणार होती. यावेळी प्रकल्प संचालक सिन्हा यांना माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी महामार्गावरील वाहतूक बंद करण्याचा इशारा दिला. त्यावेळी  नहींचे प्रकल्प संचालक सिन्हा यांनी तात्काळ रेल्वे विभागाला रेल्वे गेट उघडण्यासाठी पत्र दिले त्यानुसार 3 तासांनी रेल्वे गेट उघडण्यात आले. त्यावेळी कार्यकर्त्यांनी सुटकेचा श्वास घेतला. गेट उघडे ठेवल्याने वरणगांव सह परिसरातील नागरीकांची गैरसोय दुर होणार आहे.

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.