जिल्ह्यात १०४८ कोरोना बाधीत; १०३० रूग्ण झालेत बरे !

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात आज १०४८ कोरोना बाधीत पेशंट आढळून आले असले तरी १०३० रूग्णांनी कोरोनावर मात केल्याची बाबही दिलासा देणारी ठरली आहे. तर जळगाव, अमळनेर भुसावळ व चोपड्यासह चोपडा, रावेर आणि जामनेरातही संसर्ग वाढल्याचे दिसून येत आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून कोरोना रूग्णांची संख्या ही बाराशेच्या आत होती. तर आता हा आकडा काहीसा कमी झाल्याचे दिसून आले आहे. आज दिवसभरात पॉझिटीव्ह रूग्णांची संख्या ही पुन्हा एकदा अकराशेच्या आत म्हणजेच १०४८ इतकी झाली आहे. तर गत चोवीस तासांमध्ये १०३० रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे आता बाधीत आणि बरे होणार्‍यांचे प्रमाण जवळपास समान असल्याचे दिसून आले आहे. तर आज दिवसभरात जिल्ह्यात २१ रूग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

आजच्या रूग्णसंख्येचा विचार केला असता पुढील प्रमाणे रूग्ण आढळून आले आहेत. जळगाव शहर-२०४; जळगाव ग्रामीण-२८; भुसावळ-९०; अमळनेर-८४; चोपडा-८४; पाचोरा-६३; भडगाव-२८; धरणगाव-३४; यावल-३७; एरंडोल-२०; जामनेर-१०५; रावेर-९७; पारोळा-४६; चाळीसगाव-५०; मुक्ताईनगर-३१; बोदवड-२६ आणि इतर जिल्ह्यांमधील ३१ असे रूग्ण आढळून आले आहेत.

जळगाव जिल्ह्यात जळगाव, भुसावळ, अमळनेर, जामनेर आणि रावेर तालुक्यांमध्ये संसर्ग वाढल्याचे आता दिसून येत आहे.

Protected Content