किनगाव ते श्री क्षेत्र मुक्ताई पायी जाणाऱ्या दिंडीचे शिरसाड येथे स्वागत व महाप्रसादाचा कार्यक्रम

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | दरवर्षी प्रमाणे यावल तालुक्यातील किनगाव ते श्री क्षेत्र मुक्ताई पायी जाणाऱ्या दिंडीचे स्वागत सोहळा व महाप्रसादाचा कार्यक्रम मागील २० वर्षांपासून शिरसाड येथील माजी ग्रामपंचायत उपसरपंच धनंजय पाटील व विं. का. सोसायटीचे माजी चेअरमन आर. ई.पाटील यांच्या पाटील परिवाराकडून आयोजन करण्यात येत आहे. यावर्षी यावल तालुका शेतकरी सहकारी शेतकरी खरेदी विक्री संघाचे नवनियुक्त चेअरमन ह.भ. प.नरेंद्र दादा नारखेडे व भाजपा जिल्हा उपाध्यक्ष शरद दादा महाजन यांच्या हस्ते दिंडीचे पूजन करण्यात आले.

यावेळी शेतकरी खरेदी विक्री संघाचे नवनियुक्त व्हॉईस चेअरमन तेजस धनंजय पाटील, विद्यमान संचालक प्रवीण वारके,अतुल पाटील, माजी संचालक चंद्रशेखर चौधरी, पी एस सोनवणे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विलास पाटील,सूर्यभान पाटील सर, संजय पाटील,यावल पंचायत समितीचे माजी सभापती दीपक पाटील, भाजपा सहकार आघाडीचे जळगाव जिल्हा अध्यक्ष राकेश फेगडे, सरपंच परिषद जळगाव जिल्हाध्यक्ष पुरुजीत चौधरी, माजी सभापती रवींद्र पाटील,साकळी गावाचे सरपंच दीपक पाटील, प्रगतीशील शेतकरी साहेबराव बडगुजर, डॉ वाय.जी.नेवे, साकळी वि .का. सोसायटीचे चेअरमन अरुण खेवलकर, संचालक सुनील नेवे, मोहन बडगुजर, डॉ .सुनील पाटील, किनगाव येथील प्रगतिशील शेतकरी चंद्रकांत चौधरी, डॉ. योगेश पालवे, भाजयुमो उपाध्यक्ष योगेश खेवलकर, चंद्रकांत नेवे यांसह तालुक्यातील आदी पदाधिकारी व कार्यकर्ते, शेतकरी खरेदी विक्री संघ कर्मचारी उपस्थित होते.

दिंडीचा स्वागत सोहळा झाल्यानंतर महाराजांनी प्रवचन केले व पाटील परिवाराचे महाप्रसादाबद्दल आभार मानले. यानंतर महाप्रसाद सोहळ्याला सुरुवात झाली. दिंडीचे आगमन झाल्यानंतर संपूर्ण गावात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. महाप्रसाद घेतल्यानंतर दुपारी दिंडीचे प्रस्थान यावलकडे झाले. शिरसाड येथील पाटील परिवार अखंडपणे वारकऱ्यांची सेवा करत आहे.

Protected Content