देशात प्रथमच शाळेत शिकवायला आली एआय शिक्षिका !

तिरूवनंतपुरम-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | भारतातील शिक्षण क्षेत्रात एक क्रांतीकारक घटना घडली आहे . केरळमधील केटीसीटी उच्च माध्यमिक शाळेत एआय तंत्रज्ञानावर काम करणारी शिक्षिका नियुक्त करण्यात आली आहे. या शाळेनेच हे संशोधन केलं आहे. या शिक्षिकेचे नाव आयरिस असून मेकरलॅब्ज एज्युटेक या कंपनीने तिला विकसित केले आहे. आयरिस देशातील पहिलीच ह्युमनाईज्ड रोबोट आहे. कडुवाईल थंगल चॅरिटेबल ट्रस्टनं यासाठी प्रयत्न केले. आयरिस अटल टिकरिंग लॅब प्रोजेक्टचा भाग आहे. २०२१ मध्ये नीती आयोगानं याची घोषणा केली होती.

भारत सरकारचा प्रोजेक्ट एटीएलचा हा एक भाग आहे. शाळेमध्ये एक्स्ट्रा करिक्युलर अॅक्टिव्हिटिजला प्रोत्साहन देण्यासाठी हे डिझाईन करण्यात आलं होतं. आयरिस विविध विषयांवरील अवघड प्रश्नांची उत्तर देऊ शकते तसेच पर्सनल व्हॉईस असिस्टंट देखील देऊ शकते. इंटरअॅक्टिवली शिक्षणाचा अनुभव सुविधाजनक करु शकते. ज्याचा उद्देश शाळांमध्ये मुलांचा अॅक्टिव्हिटिजमध्ये सहभाग वाढावा हा आह. आयरिस तीन भाषेत बोलू शकते तसेच अवघड प्रश्नांची उत्तरंही देऊ शकते.

Protected Content