कुलगाममध्ये चकमक : तीन दहशतवादी ठार

श्रीनगर वृत्तसंस्था । कुलमाग जिल्ह्यातील नागनाज चिम्मेर परिसरात लष्कर आणि इतर सुरक्षा दलांनी आज अतिरेक्यांसोबत चकमक केली असून यात तीन दहशतवादी ठार झाले आहेत.

कुलगाममधील नागनाद चिम्मेर परिसरात दहशतवादी लपून बसले असल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यानंतर पोलीस, लष्कर आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकाने परिसराला घेराव घालून शोधमोहीम सुरू केली. यादरम्यान लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांच्या दिशेने गोळीबार केला. त्याला सुरक्षा दलांकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आले. यामध्ये तीन दहशतवादी ठार झाले आहेत. याच भागात अजून काही दहशतवादी लपून बसलेले असल्याची शक्यता असल्याने भारतीय जवानांनी या भागात शोधमोहीम सुरू केली आहे.

काल काश्मीरमधील कुपवाडा परिसरात लष्कराने नियंत्रण रेषेवरून दहशतवाद्यांनी केलेला घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला होता. यादरम्यान लष्कराने तीन दहशतवाद्यांना ठार केले होते. तसेच घुसखोरीच्या प्रयत्नात असलेला दहशतवादी ठार झाला. होता. यानंतर आज तीन दहशतवादी ठार झाले असल्याने अतिरेकी संघटनांना मोठा दणका बसला आहे.

Protected Content