स्वयंशोध फाऊंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । विवेकानंद प्रतिष्ठाण काशिनाथ पलोड स्कूल मधील यंदा दहावीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना नशिराबाद स्वयंशोध फाउंडेशन तर्फे वह्या, प्रशस्तीपत्र व गिफ्ट व्हाऊचर देऊन गौरविण्यात आले आहे.

मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व सरस्वती पूजन छत्रपती शाहू महाराज पूजन करून कार्यक्रमास प्रारंभ झाला. शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये नशिराबाद पंचक्रोशीतील भादली, असोदा, कडगाव, जळगाव खुर्द, सुनसगाव, वराडसीम येथील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून व गरजू होतकरू विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आल्या.

विद्यार्थ्यांना मान्यवरांनी कौतुकाची थाप देऊन शैक्षणिक मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी विवेकानंद प्रतिष्ठान काशिनाथ पलोड स्कूल प्रिंसिपल डॉ. गणेश पाटील होते.

व्यासपीठावर स्टेनोग्राफर DRM ऑफिसचे किशोर पाटील, शिवसह्याद्री प्रतिष्ठान चे अध्यक्ष गणेश चव्हाण , व्हिजन अकॅडमी संचालक अनिल सर, सामाजिक कार्यकर्ते तुषार रोटे, उज्वल कॉम्प्युटरचे संचालक गिरीश पाटील व्यासपीठावर उपस्थित होते.

यशस्वीतेसाठी फाउंडेशनचे अध्यक्ष योगेश कोलते, उपाध्यक्ष पवन तिडके, सचिव धीरज सेतवाल, सदस्य दिनेश सावळे, अक्षय घुमरे, प्रशांत मुळे, योगेश बाविस्कर, सुशील भावसार, यश सपकाळे, राहुल चौधरी, नरेंद्र धर्माधिकारी, यश सपकाळे, ललित भालेराव, प्रफुल सुगंधीवाले, योगेश बाविस्कर, निरज वाणी उपशिक्षक अनिल चौधरी यांनी सूत्रसंचालन व आभार मानले. योगेश कोलते यांनी प्रास्तविक केले. मेहनत करा जिद्द बाळगा तरच यशस्वी  व्हाल, असे मान्यवरांनी मार्गदर्शन करतांना सांगितले.

 

Protected Content