भारतीय प्रज्ञाशोध परीक्षेत पाचोऱ्यातील शिंदे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे यश

पाचोरा प्रतिनिधी | भारतीय प्रज्ञाशोध परीक्षेत पाचोरा येथील कै.सावित्रीबाई परशुराम शिंदे प्राथमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यासह प्राप्त केले आहेत.

सन २०२०/२१ वर्षाच्या ‘भारतीय प्रज्ञाशोध परीक्षेत'(आय.टी.एस.सी.) पाचोरा येथील कै. सावित्रीबाई परशराम शिंदे प्राथमिक विद्यालयाचे रिदान राजू पटेल ९८ गुण मिळवून राज्यात प्रथम, मयुरेश रवींद्र चौधरी ९४ गुण मिळवून राज्यातून तिसरा क्रमांक प्राप्त केला आहे. तर सुकृत विजय पाठक ९२ गुण मिळवून जिल्ह्यातून प्रथम तर ८६ गुण मिळवून प्राची विलास पाटील हिने पाचोरा केंद्रातून प्रथम क्रमांक पटकावला आहे.

यशस्वी विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक एस. एन. पाटील तसेच इयत्ता २ री च्या वर्गशिक्षिका सरोज बावा यांचे ऑनलाईन व ऑफलाईन मार्गदर्शन लाभले. यश संपादित केलेल्या विद्यार्थ्यांचे शाळेचे चेअरमन पंडित शिंदे यांचेसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करत त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Protected Content