बाळद येथील जुगार अड्डयावर छापा ; ७ जुगारी ताब्यात

पाचोरा प्रतिनिधी । तालुक्यातील नगरदेवळा येथून जवळच असलेल्या बाळद गावी सुरू असलेल्या जुगार अड्डयावर नगरदेवळा पोलिसांनी छापा टाकून सात जणांना ताब्यात घेतले असून ५ मोटारसायकली सह १ हजार ४०० रुपये रोख असा एकूण ९२ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

या कार्यवाही मुळे पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत असून गावातही शेतांमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यांवर कार्यवाही व्हावी अशी गावात चर्चा सुरू आहे.

बाळद येथे तितुर नदीच्या काठी बेबाबाई दिलीप पाटील यांचे शेतात काही लोक जुगार खेळत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याअनुषंगाने पोलिसांनी छापा टाकला असता जुगारी चंद्रभान दिलीप पाटील, समाधान नथु पवार, इस्माईल बेग सफदर बेग, शेख रउफ शेख अजीज, शब्बीर शाह यासिन शाह, नगराज राजधार मोरे व अन्य एक अश्या सात जुगाऱ्याना स्वतःच्या फायद्यासाठी झन्ना – मन्ना नावाचा खेळ खेळतांना मिळून आले आहे. पो. कॉ. मनोहर पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्यांच्यावर मुंबई जुगार अॅक्ट कलम १२ (अ) प्रमाणे व आपत्ती व्यवस्थापन कायदा भा.द.वी. कलम १८८, २६९, २७० प्रमाणे पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कार्यवाही पोलिस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय नलावडे,  सहाय्यक फौजदार ज्ञानेश्वर पाटील, कैलास पाटील, पोलिस हेड कॉ. विनोद पाटील, पो कॉ. नरेंद्र विसपुते, मनोहर पाटील, अमोल पाटील, नरेश शिंदे यांनी केली. पुढील तपास सहाय्यक फौजदार ज्ञानेश्वर पाटील करीत आहेत.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Protected Content