किरकोळ कारणावरून प्रौढाला बेदम मारहाण

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । नशिराबाद गावातील बसस्थानकाजवळ सुरू असलेले भांडण करू नका असे सांगितल्याच्या रागातून प्रौढ व्यक्तीला जमवाने लोखंडी पाईप, लाकूड आणि काठ्यांनी मारहाण करून जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली. नशिराबाद पोलीस ठाण्यात ९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, गुलाम दस्तगीर शेख अजिज (वय-४२, रा. नशिराबाद) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. रविवार २० ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजून १० मिनिटांनी नशिराबाद बसस्थानक येथे सुरू असलेले भांडण करू नका अशी समज देण्यासाठी गेले, याचा राग आल्याने सय्यद अली हयात आली, कालू हयात अली, शेरा आली हयात अली, मुन्ना हयात अली, सुलतान अली हयात अली, नुर अली हयात अजीम, नवाज अली अजीम, अजीम अली इसा मेंबर आणि गुड्ड्या अली हयात अली सर्व रा. चौपाल मोहल्ला, नशिराबाद यांनी लोखंडी पाईप आणि लाट्याकाठ्याने बेदम मारहाण करून जखमी केले. तसेच गुलाम दस्तगीर शेख अजीज याचे वडील अजिज मुसा शेख यांना देखील शिवीगाळ करत धमकी दिली. यात गुलाम दस्तगीर शेख अजीज हा जखमी झाला, त्याला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, त्याने दिलेल्या फिर्यादीवरून सोमवारी २१ ऑगस्ट रोजी रात्री उशिरा नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल रसूल शेख करीत आहे.

Protected Content