अवैध वाळू वाहतूक करणारे वाहन पकडले

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील फुफनगरी फाट्याजवळून विनापरवाना वाळू वाहतूक करणारे पिकअप व्हॅन बोलेरो सोमवारी तालुका पोलिसांनी पकडले. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गेल्या आठवड्यापासून जिल्हा प्रशासनाने अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर जोरदार धडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान सोमवारी २१ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता महेंद्र बोलेरो पिकअप वाहन क्रमांक (एमएच १९ सी वाय ८२५७) मधून वाळूची चोरटी वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक आप्पासो पवार यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी कारवाई करण्याच्या सूचना पथकाला दिल्या. पथकाने जळगाव तालुक्यातील फुफनगरी फाट्याजवळ कारवाई करत वाहन अडविले, वाहनाची चौकशी केली असता त्यामध्ये एक ब्रास वाळू भरलेले आढळून आले. याबाबत चौकशी केली असता चालकाने उडवाउडवीचे उत्तर देत पसार झाला. दरम्यान पोलिसांनी वाळूने भरलेले महिंद्रा पिकप व्हॅन जळगाव तालुका पोलीस ठाण्यात जमा केले. याप्रकरणी पोहेकॉ महेंद्र सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वाहनावरील अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल दिनेश पाटील करीत आहे.

Protected Content