बसमधून महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत लांबविली

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव ते जामनेर रस्त्यावरील गाडेगाव घाट जवळून बसमध्ये प्रवास करताना महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र चोरून नेल्याचे सोमवारी समोर आले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एमआयडीसी पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, रंजना अनिल चव्हाण (वय-१९, रा. कंडारी ता.जि.जळगाव) या महिला सोमवारी २१ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजून ४५ मिनिटांनी जळगाव ते जामनेर दरम्यान बसमध्ये प्रवास करत होते. त्यावेळी बसमध्ये बसणाऱ्या पारू गणेश चव्हाण (वय-२८, रा. वजीरखेडा ता. सिल्लोड जि. औरंगाबाद) आणि तिच्यासोबत असलेल्या १५ वर्षीय व १० वर्षीय अल्पवयीन दोन मुली यांनी महिलेच्या गळ्यातील १० हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र चोरून नेले. हा प्रकार उघडकीला आल्यानंतर महिलेने एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी महिला पारू गणेश चव्हाण यासह दोन अल्पवयीन मुलींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अनिश शेख करीत आहे.

Protected Content