Home Cities जळगाव जळगावात भाजपच्या कोअर कमिटीची बैठक सुरु (व्हिडीओ)

जळगावात भाजपच्या कोअर कमिटीची बैठक सुरु (व्हिडीओ)

0
112

bhajpa meeting

जळगाव, प्रतिनिधी | भाजपतील पक्षांतर्गत गटबाजीच्या पार्श्वभूमीवर आज जळगावात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत उत्तर महाराष्ट्र कोअर कमिटीची बैठक होत आहे. निर्धारित वेळेपेक्षा तब्बल दोन तास उशिराने सुरू झालेल्या या महत्त्वपूर्ण बैठकीला भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे यांची अनुपस्थिती आहे. खडसेंनी या बैठकीला दांडी मारली की काय? अशी चर्चा सुरू आहे.

 

या बैठकीला प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, प्रदेश संघटनमंत्री विजय पुराणिक, माजीमंत्री गिरीश महाजन, सुभाष भामरे, जयकुमार रावल, विभागीय संघटनमंत्री किशोर काळकर, जिल्हाध्यक्ष डॉ.संजीव पाटील आदी नेत्यांची उपस्थिती आहे. विधानसभा निवडणुकीत अपेक्षित यश न मिळाल्याने भाजपकडून पक्षसंघटन बळकटीसाठी चाचपणी सुरू झाली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि प्रदेश संघटनमंत्री विजय पुराणिक यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्यातील विभागनिहाय आढावा घेण्याचे काम सुरू आहे.

 

 


Protected Content

Play sound