डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षात असणार्‍या भावी डॉक्टरांनी रावेर तालुक्यातील तिड्या या गावातील गरजू विद्यार्थ्यांप्रती आपुलकीची भावना ठेवत शैक्षणिक साहित्याचे वाटप करुन दातृत्वाची भावना जपली. दप्तरापासून ते पाण्याच्या बॉटलपर्यंत सर्वच साहित्य नवे कोरे-करकरीत मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावर आनंद ओसंडून वाहत होता.

 

गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात मेडिकल अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षात शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांनी गरजू विद्यार्थ्यांसाठी मदतीचा हात पुढे करुन स्तुत्य उपक्रम राबविला. डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.एन.एस.आर्विकर, प्रशासकीय अधिकारी प्रमोद भिरुड, डॉ.बापुराव बिटे यांच्या मार्गदर्शनाखाली शैक्षणिक साहित्य वाटप हा कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी तिड्या येथील जिल्हा परिषद शाळेचे केंद्रप्रमुख रामराव मुरकुटे, मुख्याध्यापक विजय पाटील यांच्यासह शिक्षकवृंद उपस्थीत होते. याप्रसंगी भावी डॉक्टरांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्व पटविले. जिल्हा परिषद शाळेतर्फे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

 

या उपक्रमासाठी स्टुडंट असोसिएशन सेलमधील मुकेश टेकाळे, अजय राख, तुषार नाले, आरफ चौधरी, धनंजय अरसुल, सुरभी तळेकर, रोहित पाटील, सेजल जैन, जान्हवी मापारी यांच्यासह डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापक डॉक्टर्स उपस्थीत होते. यावेळी ३० विद्यार्थ्यांना दप्तर, डबा, पाणीबॉटल, कंपास, क्रिडा साहित्य अशा विविध शैक्षणिक साहित्यासोबतच खाऊचेही वाटप करण्यात आले.

Protected Content