‘एसआरपीएफ’चे श्रेय ना. महाजन यांचेच ; खडसे समर्थक गल्लतीमुळे खजील

d379f76a 1ece 4da5 b461 9eb748a3eaac

जळगाव (प्रतिनिधी) भुसावळ तालुक्यातील हतनूर (वरणगाव) येथे राज्य राखीव पोलीस बल गट अर्थात एसआरपीएफ क्रमांक 19 ची स्थापनेचे श्रेय पालकमंत्री ना. गिरीश महाजन यांचेच आहे. कारण फक्त जागा सारखी असल्याने पोलीस प्रशिक्षण केंद्र आणि एसआरपीएफबाबत खडसे समर्थकांची गल्लत झाली. त्यामुळे त्यांना आता खजील व्हावे लागत आहे.

 

या संदर्भात अधिक असे की, राज्य राखीव पोलीस बल गट अर्थात एसआरपीएफ क्रमांक 19 ची स्थापनेस मंत्रीमंडळाच्या बैठकीत नुकतीच मान्यता दिलीय. यावरून खडसे समर्थकांनी ना. महाजन यांच्यावर सोशल मीडियात ‘आयत्या बिळावर नागोबा’ हा हॅशटॅग वापरून टीका केली होती. परंतू खडसे समर्थकांनी २० वर्षापूर्वी ज्या भूमिपूजनाचे जे फोटो व्हायरल केले होते. ते फोटो पोलीस प्रशिक्षण केंद्राचे होते. तर आताची मंजुरी ही राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 19 ची स्थापन करण्यास मिळालेली आहे.

 

हतनूर (वरणगाव) ता. भुसावळ येथे राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 19 ची स्थापन करण्यास मंत्रीमंडळाच्या बैठकीत नुकतीच मजुरी देण्यात आली. याकरीता 1384 पदांची निर्मिती करण्यास तत्वत: मान्यता देण्यात आली. तसेच राज्य राखीव पोलीस बल गट निर्मितीसाठी अपेक्षित असलेल्या सुमारे एकूण 56.61 कोटी आवर्ती व 81.01 कोटी अनावर्ती खर्च मंजूर करण्यासही राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. प्रशासनाकडून आलेल्या प्रेसनोटमध्ये राज्याचे वैद्यकीय शिक्षण, जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गिरीष महाजन यांच्या प्रयत्नाने पोलीस प्रशिक्षण केंद्र मंजूर झाल्याचे म्हटले होते. त्यामुळे स्थानिक प्रसार माध्यमांनी बातम्या प्रसिद्ध केल्या.

 

खडसे समर्थक माजी नगरसेवक तथा भाजपचे माजी शहरप्रमुख अशोक लाडवंजारी यांनी सोशल मीडियात एकनाथ खडसे यांच्या पाठपुराव्यामुळेच ही मंजुरी 20 वर्षांपूर्वीच मिळाली होती.तसेच निधीसाठी खडसे यांचा पाठपुरावा सुरू होता. या आशयाचा संदेश मोठ्या प्रमाणात व्हायरल केला. परंतू 7 डिसेंबर 1997 रोजी वरणगाव येथे पोलिस प्रशिक्षण केंद्राचे भुमिपुजनही करण्यात आले होते. त्यावेळी वरणगाव हे आ. खडसे यांच्या मतदार संघात होते. तत्कालीन मंत्री असलेल्या खडसेंनी या प्रकल्पासाठी शासनाला जमीन उपलब्ध करुन दिली होती. परंतू पोलीस प्रशिक्षण केंद्र हा वेगळा भाग आहे. आणि राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 19 हा वेगळा विषय आहे. त्यामुळे या प्रकरणात खडसे समर्थकांची मोठी गल्लत झाली असून ना. महाजन यांना शह देण्याच्या नादात चूक केली आहे.

 

जागेमुळे झाला गैरसमज

 

7 डिसेंबर 1997 रोजी वरणगाव येथील ज्या जागेवर पोलिस प्रशिक्षण केंद्राचे भूमिपूजन करण्यात आले होते. ते पोलिस प्रशिक्षण केंद्र काही वर्षापूर्वीच अन्यत्र हलविण्यात आले आहे. त्यामुळे गृह विभागाच्या ताब्यात असलेल्या जागेचा उपयोग करून घ्यावा म्हणून या जागेवर राज्य राखीव पोलीस बल गट अर्थात एसआरपीएफ क्रमांक 19 ची स्थापन करण्यास मंजुरी देण्यात आली. परंतू ज्या जागेवर खडसे यांनी २० वर्षापूर्वी भूमिपूजन केले. त्याच जागेवर ‘एसआरपीएफ’ची मंजुरी मिळाल्यामुळे खडसे समर्थकांचा गैरसमज झाला.

जिल्ह्याचा मोठा फायदा

राज्य राखीव पोलीस बल गट जळगावसाठी एकूण 1384 पदे मंजूर करण्यात आली आहे. त्यामुळे नौकरी एक नवीन संधी जळगावमधील तरुणांना मिळेल. एवढेच अन्व्हे तर, कायदा सुव्यवस्थेची मोठी स्थिती निर्माण झाल्यास जळगाव पोलीस दलाला धुळे, अमरावतीसारख्या जिल्ह्यांवर अवलंबून राहावे लागणार नाही. त्यामुळे जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडल्यास एक मोठा फोर्स ताब्यात राहणार आहे. दरम्यान, कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने गृह मंत्रालय प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र राज्य राखीव पोलीस बल गट निर्माण करण्याच्या विचाराधीन आहे.

Protected Content