Home आरोग्य जिल्ह्यातील कोरोना बाधीतांची संख्या साडेसातशेच्या उंबरठ्यावर

जिल्ह्यातील कोरोना बाधीतांची संख्या साडेसातशेच्या उंबरठ्यावर

0
48


जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात आज ३७ नवीन कोरोना बाधीत रूग्ण आढळले असून यामुळे आता जिल्ह्यातील कोरोना पॉझिटीव्ह असणार्‍या रूग्णांची संख्या ७३८ इतकी असल्याचे प्रशासनाने जाहीर केले आहे.

जिल्हा कोविड रूग्णालयाने पाठविलेल्या कोरोना अहवाल जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे. आज दुपारी प्राप्त झालेल्या अहवालात एकुण ४५ रूग्ण पॉझिटीव्ह आले आहे. यातील ८ हे आधीदेखील पॉझिटीव्ह असून त्यांचा रिपोर्ट दुसर्‍यांदा पॉझिटीव्ह आलेला आहे.एकुण बाधितांचा आकडा आता ७३८ वर पोहचला आहे. यापैकी जळगाव शहरात १२, ग्रामीण २, भुसावळ ७, यावल ३, रावेर १, धरणगाव ३, अमळनेर ५, पाचोरा व चोपडा प्रत्येकी १ आणि जामनेर २ असे रूग्ण आढळले आहेत.


Protected Content

Play sound