पंधरा लाखांची मागणी करत विवाहितेचा छळ

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अयोध्या नगर येथील माहेर असलेल्या विवाहितेला १५ लाख रूपयांची मागणी करत सासरी डोंबीवली येथे मारहाण करत छळ केल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी बुधवारी १३ मार्च रोजी रात्री १० वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरात अयोध्या नगरातील माहेर आलेल्या ऐकता राहूल राणे वय ३२ याचा विवाह डोंबिवली येथील राहूल जगदीश राणे यांच्या सोबत रितीरिवाजानुसार झालेला आहे. लग्नाचे सुरूवातीचे दिवस चांगले गेले त्यानंतर किरकोळ कारणावरून टोमणे मारणे सुरू केले. त्यानंतर पती राहूल राणे याने विवाहितेला माहेराहून १५ लाख रूपये आणावे अशी मागणी केली. विवाहितेने पैसे आणले नाही म्हणून शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच सासू आणि सासरे यांनी देखील विवाहितेला पस दिली. हा प्रकार सहन न झाल्याने विवाहिता माहेरी निघून आल्या. त्यांनी बुधवारी १३ मार्च रोजी रात्री १० वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पती राहूल जगदीश राणे, सासरे जगदीश विष्णू राणे आणि सासू विद्या जगदीश राणे तिघे रा. डोंबिवली यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ दत्तात्रय बडगुजर हे करीत आहे.

Protected Content