गौण खजिन प्रकरणी दाखल होणार गुन्हे ! : पल्लवी सावकारेंचा पाठपुरावा

जळगाव प्रतिनिधी | जिल्हा परिषदेतील गौण खनिजाच्या बोगस पावत्यांच्या प्रकरणी जि.प. सदस्या पल्लवी प्रमोद सावकारे यांचा पाठपुरावा सुरू असून या संदर्भात आता गुन्हे दाखल होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.

जिल्हा परिषदेच्या जलसंधारण आणि बांधकाम विभागातील विकास कामांसाठी गौण खनिजाच्या बोगस पावत्या जोडून बिले लाटणार्‍या कंत्राटदारांवर गुन्हे दाखल करावे या मागणीसाठी जिल्हा परिषद सदस्या सौ. पल्लवी प्रमोद सावकारे या सातत्याने पाठपुरावा करत आहेत. वाळूच्या बोगस पावत्या जोडून शासनाला कोट्यवधी रूपयांचा चुना लावणार्‍यामध्ये ठेकेदारांसह काही यंत्रणेतील अधिकारी, कर्मचारी देखील सहभागी असल्याचा त्यांनी आरोप केला असून याचे पुरावे देखील सादर केले आहेत.

दरम्यान, गौण खनिज प्रकरणाच्या चौकशीला विलंब होत असल्याने पल्लवी सावकारे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांची भेट घेऊन त्यांना या प्रकरणाची माहिती देऊन चौकशीत होणारा विलंब त्यांच्या लक्षात आणून दिला. त्यानंतर डॉ. आशिया यांनी दोषीवर तातडीने गुन्हे दाखल करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या प्रकरणाची इत्यंभूत माहिती घेऊन गुन्हे दाखल केले जाण्याची शक्यता आहे.

Protected Content