यावल ते भुसावळ राज्य मार्गावर पुनश्च खड्डे

यावल प्रतिनिधी- यावल ते भुसावळ या राज्य मार्गाची अत्यंत दयानिय अवस्था झाली असुन या मार्गावरील पडलेल्या खडयांमुळे रस्त्याच्या कामाबाबत गुणवत्तेचा प्रश्न निर्माण झाले आहे.

यावल ते भुसावल या राज्य मार्गावर भुसावळ शहर हे रेल्वेचे जक्शन स्टेशन व नागरीक व शासकीय नोकर वर्ग तथा व्यापाऱ्यांची खरेदीची मोठी बाजारपेठ असल्याने या रस्त्यावर नेहमीच दुचाकी वाहनांसह अवजड वाहनाची नेहमीच वर्दळ असते. या मार्गावरील खड्डया मुळे अनेक अपघात होवुन निरपराध नागरीकांनी आपला जिव गमवावा लागला असुन, या राज्यमार्गावर मागील एक ते दिड वर्षापासुन या१७ किलो मिटरच्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे निर्माण झाले होते. या रस्त्या संदर्भात विविध माध्यमानी बातम्या प्रसिद्ध केल्याने अखेर या मार्गाचे तिस ते चाळीस लाख रुपयांचा निधी करून रस्त्याचे दुरुस्ती करण एक महीन्यापुर्वीच करण्यात आले होते. मात्र नुकत्याच झालेल्या पावसाच्या पाण्यात पुनश्च हा खडेमय झाले असुन रस्त्याची अवस्था ‘जैसे थे’ होतांना दिसत आहे.

ठेकेदाराने केलेल्या या कामा बद्दल व कामाच्या गुणवत्ते मोठे प्रश्न निर्माण झाले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ या यावल ते भुसावळ राज्य मार्गावरील रस्त्याच्या झालेल्या दयनिय अवस्थेकडे गांर्भीयाने लक्ष देवुन त्वरीत रस्त्याची दुरुस्ती करून संभाव्य अपघाताचे धोके टाळावे अशी मागणी वाहनधारक व नागरीकांकडुन करण्यात येत आहे .

Protected Content