मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांना पदोन्नती

पाचोरा, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | येथील नगरपरिषदच्या मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांना मुख्याधिकारी गट “अ” या पदावर पदोन्नती झाली आहे. त्यांचे कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

 

दि. १८ एप्रिल रोजी सायंकाळी नगरविकास विभागाचे मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांना पदोन्नतीचे आदेश प्राप्त झाले आहे. याबाबत नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. दि. १९ एप्रिल रोजी मुख्याधिकारी नगरपरिषद कार्यालयात उपस्थित झाल्यानंतर कर्मचा-यांतर्फे त्यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्याधिकारी बाविस्कर यांनी छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयास अभिवादन केले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकातून त्यांची ढोल ताश्यांसह वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. यावेळी कर्मचा-यांचा उत्साह पाहण्यासारखा होता. नगरपरिषद कार्यालयात प्रवेश करतांना फटाक्यांच्या आतिषबाजींने त्यांचे जल्लेाषात स्वागत करण्यात आले. अनपेक्षीतपणे झालेल्या या स्वागत सत्काराच्या कार्यक्रमामुळे मुख्याधिकारी या अत्यंत भारावून गेल्यात व माझ्यावर कर्मचाऱ्यांनी दाखविलेल्या प्रेमाबद्दल आपुलकीबद्दल सर्वांचे आभार मानत त्यांनी यापुढे देखील असेच प्रेम व सहकार्य मला मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी प्रशासकिय अधिकारी प्रकाश भोसले, नगररचनाकार मानसी भदाणे, भांडारपाल प्रगती खडसे, रोखपाल सुधीर पाटील, वरिष्ठ लिपीक रमेश भोसले, सभा लिपीक राजेंद्र शिंपी, लिपीक ललित सोनार, विलास देवकर, प्रकाश पवार, संदिप भोसले, किशोर मराठे, प्रकाश गोसावी, रोहीत अहिरे, आकाश खैरनार, संदिप जगताप, नाना धनगर, गोपाल लोहार, भिकन गायकवाड, विशाल मराठे, भागवत पाटील, महेंद्र गायकवाड, रफिक बेग, फिरोज पठाण, सुभाष चौधरी, उध्दव महाजन, अनिल वाघ, युवराज जगताप, विजेंद्र निकम, मनोज पाटील, गणेश अहिरे, कल्पना पवार, यमुना ब्राम्हणे, कल्पना वैद्य, सुरेखा पाटील, रुमा खेडकर, सचिन बागूल, नितीन गायकवाड, सुरेश पाटील आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Protected Content