महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शासकीय योजनांबाबत जनजागृती

धरणगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती देण्यात येत आहे. याचा शुभारंभ दि. १८ एप्रिल रोजी रोटावद येथे राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभाग महिला जिल्हा अध्यक्ष कल्पना अहीरे यांच्या हस्ते करण्यात आला.

 

कल्पना अहिरे यांनी यावेळी सांगितले की, समाज आणि गट-तट ऐकत्रितपणे आणण्यासाठी आपल्या समाजातील मान्यवरांनी आपल्या वैयक्तिक समस्या तूर्त बाजूला ठेवून जीवनातील मिळालेला वेळ हा समाज ऐकवटून ठेवण्यासाठी खर्ची घालावा. प्रत्येक खेड्यातील, नगरातील,शहरातील डॉ. बाबासाहेबांच्या लेकरांनी ,अनूयायांनी उत्साहपूर्वक व शितबद्ध मान वंदना दिली. तसेच त्यांनी सर्व भिम-बुद्ध अनुयायी बांधवांनी आपल्या सह,सर्व जाती -धर्माच्या लोकांना सोबत घेऊन भिम जयंती साजरी केल्याने समाज बांधवांचे कौतुक केले. ज्यांना कोणाला भोंगे लावायचे तर लावु द्या, कोणाला हनुमान चालीसा, वाचायचा तर वाचुद्या, कोणाला जातीय दंगली करायच्या असतील तर करु द्या पण आंबेडकरी तरुणांनो तुम्ही तुमचे शिक्षणावरुन मन विचलीत होवू देवु नका. तुम्ही आयएएस, आयपीएस, एमपीएससी, डॉक्टर, वकील, इंजिनियर होवुन या भारत देशाचे आदर्श नागरिक म्हणुन नावा रुपास आले पाहिजे. आता तुमच्यावर फार मोठी जबाबदारी आलेली आहे ती म्हणजे भारतीय संविधानाचे रक्षण करून संसदीय लोकशाही टिकविणे. या देशाचे भवितव्य आंबेडकरवादी तरुणांनो तुमच्या हातात आहे. यासाठी तुम्ही उच्च शिक्षण घेवुन विविध पदव्या घेवुन डॉ. बाबासाहेब आंबेडरकर यांच्या विचारतील भारत देश निर्माण करा.

Protected Content