चोपडा येथे विवेकानंद विद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

chopda 2

चोपडा ( प्रतिनिधी ) येथील विवेकानंद विद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जंयती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण  करण्यात आले.

 

डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापक नरेंद्र भावे, अनिल शिंपी,  संदिप कुलकर्णी , पवन लाठी,  संजय सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यालयातील  माध्यमिक विभागाचे उपशिक्षिक पवन लाठी यांनी बाबासाहेबांच्या जीवनपरीचयावर प्रकाशझोत टाकला. कलाशिक्षक राकेश विसपुते यांनी फलक लेखन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार उपशिक्षक राधेशाम पाटील यांनी मानले.  कार्यक्रमास सर्व विभागाचे मुख्याध्यापक , शिक्षक , कर्मचारीवृंद, विद्यार्थी उपस्थित होते.

 

 

Add Comment

Protected Content