सदावर्तेच्या जामीन अर्जाची सुनावणी लांबली

मुंबई/ कोल्हापूर, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा – कोल्हापूर शाहुपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे, या गुन्हासंदर्भात कागदपत्रे उपलब्ध न झाल्याने अड्.सदावर्तेच्या जामीन अर्जाची सुनावणी लांबणीवर पडली आहे. त्यामुळे सदावर्ते च्या अडचणी वाढणार असल्याचे दिसून येत आहे.

अड्.सदावर्ते यांनी विविध मार्गांनी पैसा जमा केला, तो पैसा मराठा आरक्षण विरोधात न्यायालयीन प्रक्रिया संदर्भात खर्च केला, याचा हिशोब दिलेला नाही, या संदर्भात सकल मराठा क्रांती मोर्चाचे दिलीप पाटील यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

यासंदर्भात अड्.सदावर्ते यांच्या अटक पूर्व जामीन अर्जावर प्रथमवर्ग जिल्हा व सत्र न्यायाधीश जाधव यांच्यासमोर सुनावणी सुरु आहे.  या संदर्भात शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस मुंबई येथे अड्.सदावर्ते यांना ताब्यात घेण्यासाठी गेले होते. सरकार पक्षाला आवश्यक ते कागदपत्र वेळेवर उपलब्धता न झाल्याने अटकपूर्व जामीन अर्ज सुनावणी लांबणीवर पडली असून गुरुवार २१ रोजी घेण्यात येणार आहे.

Protected Content