सदावर्तेची पोलीस कोठडी वाढवण्याची मागणी

मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा – अड्.सदावर्ते यांच्या घरात संशयास्पद कागदपत्रे आढळली असून त्यांची पोलीस कोठडी वाढवून देण्यात यावी, अशी मागणी सरकारी वकील प्रकाश घरत यांनी न्यायालयाकडे केली आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ‘सिल्वर ओक’ निवासस्थान हल्ला प्रकरणी अटकेत असलेल्या अड्.सदावर्तेच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. अड्.सदावर्तेच्या घरी तपासादरम्यान पोलिसांना नोटा मोजण्याच्या मशीनसह रजिस्टर आढळले आहे. या रजिस्टरमध्ये एसटी कर्मचाऱ्याकडून वर्गणी स्वरुपात जमा करण्यात आलेल्या पैशांची नोंदी असून दादर परळ, भायखळा आदि ठिकाणी मालमत्ता आहेत. तसेच चारचाकी वाहने देखील असून या सर्व मालमत्तांची खरेदी एसटी कर्मचाऱ्याकडून जमा झालेल्या पैशातून झाली आहे कि कसे यासाठी पोलिसांकडून चौकशी होण्याची आवशक्यता आहे. त्यामुळे अड्.सदावर्ते यांची पोलीस कोठडी वाढवून देण्यात यावी अशी मागणी सरकारी वकील प्रदीप घरत यांनी न्यायालयाकडे केली आहे.

Protected Content