केंद्रीय सांस्कृतिक कार्यक्रम समितीवर शाहीर शिवाजीराव पाटील

पाचोरा, प्रतिनिधी | तालुक्यातील नगरदेवळा येथील ख्यातनाम लोकशाहीर शिवाजीराव पाटील यांची भारत सरकारच्या सांस्कृतीक कार्यक्रम समितीवर निवड करण्यात आली आहे.

याबाबत वृत्त असे की, तालुक्यातील नगरदेवळा येथील रहिवासी तथा महाराष्ट्र शाहीर परिषदेचे जळगाव जिल्हा अध्यक्ष व खानदेश लोकरंग फाउंडेशनचे अध्यक्ष तसेच खानदेशातील सुप्रसिद्ध लोकशाहीर समाजभूषण शिवाजीराव पाटील यांची भारत सरकारच्या, सांस्कृतिक विभागाच्या, पश्चिम विभागीय सांस्कृतिक केंद्र उदयपुर (राजस्थान) तर्फे कार्यक्रम समितीवर नुकतीच महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागामार्फत निवड करण्यात आली आहे.

या निवडीचे पत्र शिवाजीराव पाटील यांना प्राप्त झाले आहे. महाराष्ट्रातील व भारतातील वेगवेगळ्या प्रांतातील वेगवेगळ्या व लोकसंस्कृतीच्या कार्यक्रमांना तसेच कार्यक्रमाबाबत च्या प्रस्तावांना मान्यता देण्यासाठी महाराष्ट्रातील नामवंत लोककलाकार चंदाताई तिवाडी, व खानदेशातील सुप्रसिद्ध शाहीर शिवाजीराव पाटील या दोन कलावंतांची निवड शासनातर्फे करण्यात आलेली आहे. शाहीर शिवाजीराव पाटील यांच्या निवडीबद्दल महाराष्ट्रातील सर्व लोककलावंतांसह परिसरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

Protected Content