जिल्ह्यातील व्यवसाय पुर्णपणे अनलॉक करा; जिल्हा व्यापारी महामंडळाची मागणी

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यामधील व्यवसाय पूर्णपणे अनलॉक करण्यासंदर्भात जळगाव जिल्हा व्यापारी महामंडळाच्या वतीने जिल्हाधिकारी अभिजीत रावते यांना निवेदनाद्वारे मागणी करण्यात आले आहे. या निवेदनावर महामंडळाचे अध्यक्ष विजय काबरा, कार्याध्यक्ष सुरेश चिरमाडे, सचिव ललित बरिया आदी उपस्थित होते.

जिल्हा व्यापारी महामंडळाच्यावतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जळगाव जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून नागरिकांना वेळोवेळी सूचना व निर्देश देऊन तसेच लावून व जनता कर्फ्यू आदींचे आदेश आपल्याकडून करण्यात आले आहे. असे असतांना सार्वजनिक ठिकाणी व संपूर्ण शहरात गर्दी करून कारण नसताना रिकामटेकडे प्रमाणे फिरत असल्याचे वेळोवेळी दिसून येत आहे. याकरीता उपाययोजना करण्यासाठी फक्त दुकाने, मार्केट, कॉम्प्लेक्स आदींचा वापर बंद करणे किंवा सम-विषम दिनांकाच्या निकषाप्रमाणे दुकाने सुरू ठेवणे हा उपाय होऊ शकत नाही, उलट लॉकडाऊन करूनही विषाणूचा संसर्ग कमी झालेला नाही, तो वाढत आहे असे एकंदरीत चित्र आहे.

बंद पाळून, दुकाने बंद ठेवून, कर्फ्यू लावून विशेष फायदा झालेला नसून सगळ्यांपुढे स्पष्ट झालेले आहे. उलट व्यापार बंद ठेवल्याने लक्षावधी लोकांवर न भुतो असे संकट ओढवले आहे. आजवरच्या सर्व प्रयोगानंतर तरी लॉकडाऊन किंवा सम-विषम तारखांना दुकाने बंद करणे हे करून संसर्ग वाढू न देण्यासाठी अधिक परिणामकारक झाले नसल्याने उलट आर्थीक संकट दिवसेंदिवस मोठे होत आहे. जिल्हाधिकारी यांनी सखोल विचार करून आणला घोषित करावा आणि व्यापार तसेच दुकाने पूर्ववत सुरू करण्याचा आणि बाधित व्यक्ती व त्यांचे कुटुंब यांना क्वारंटाईन करणे तसेच विनाकारण करणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी जळगाव जिल्हा व्यापारी महामंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

Protected Content