पैशांसाठी एकाला डांबून ठेवले; धारदार चॉपरचा दाखविला धाक !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । उसनवारीने घेतलेल्या ७ लाख रुपयांसाठी तरुणाचे रिंग रोड परिसरातून अपहरण करुन त्याला जैनाबाद परिसरात डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकारसमोर आला आहे. दरम्यान, तरुणाला धारदार चॉपरसह त्याला बेसबॉलची बॅट दाखवून पैशांसाठी धमकीविण्यात आले. याप्रकरणी शुक्रवारी २४ मार्च रोजी दुपारी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती की, शहरातील सिंधी कॉलनीमध्ये सनी इंद्रकुमार साहित्या हा तरुण वास्तव्यास असून तो वडीलांसोबत दुकान चालवून कुटुंबाचा उदनिर्वाह करतो. सनी साहित्याला गरज असल्याने त्याने जैनाबाद येथील सागर सैंदाणे याच्याकडून ६ मार्च रोजी ७ लाख रुपये उसनवारीने घेतले होते. त्यातील दीड लाख रुपये त्याने १८ मार्च रोजी त्याला रोख स्वरुपात परत केले आहे. २३ रोजी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास सागर हा घरी असतांना त्याला सागर सैंदाणे याने फोन करुन तु मला पू.ना. गाडगीळ येथे भेटायला ये असे सांगितले. त्यानुसार सनी हा लागलीच त्याचा मित्र पियुष मंदान याला सोबत घेवून पुनागाडगीळ येथे भेटण्यासाठी गेला. याचवेळी सागर सैंदाणे याच्याकडे असलेली (एमएच ०९ एफबी ७७२७) क्रमांकाची गाडीत सनीचा हात पकडून तु गाडीत बस असे बोलून त्याला गाडीत बसविले. यावेळी आपण जेवणासाठी बाहेर जात असल्याने सांगून सनी सोबत असलेले आकाश दुबे, आदर्श पुरोहीत, पियूष मंदान यांना सुद्धा त्यांनी गाडीत बसविले. त्यानंतर गाडी चालविणारा शेखर सपकाळे याने गाडी भरधाव वेगाने जैनाबादच्या दिशेने घेवून गेले.सनी साहित्याने सागर सैंदाणेला आम्हाला कुठे नेत आहात असे विचारले असता, तो बोलला की तुझ्याकडे असलेले माझे उसणे पैसे तू परत कधी करणार आहेस. ते माझ्या आईसोबत दोन मिनिटे बोलण्यासाठी तुला घेवून आहे. असे सांगत त्याला सागर सैंदाणेच्या घरी घेवून गेले. नंतर जैनाबाद परिसरात डांबून ठेवले होते. त्या ठिकाणी धारदार वस्तू चॉपर इतर वस्तूंचा धाक दाखवून पैसे मागणी करून धमकी दिल्याचा घटना घडली आहे. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात शुक्रवार २४ मार्च रोजी २ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शहर पोलीस कर्मचारी करीत आहे.

Protected Content