एरंडोल व पारोळा तालुक्यातील विविध समस्यांबाबत निवेदन

एरंडोल प्रतिनिधी । एरंडोल तथा पारोळा तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. त्याअनुषंगाने या दोन्ही तालुक्यातील रुग्णांना येणाऱ्या विविध समस्यांचे माजी आमदार डॉ. सतिष पाटील व राज्याचे पाणी पुरवठा मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना निवेदन देण्यात आले.

दोन्ही तालुक्यात ऑक्सिजन प्लांट उभारणे तसेच दोघेही तालुक्यातील ऑक्सिजन अभावी रुग्णांचे दगावण्याचे प्रमाण वाढत आहे. तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण होत नाही,कॉटेज हॉस्पिटलमध्ये एकच वैद्यकीय अधिकारी आहे,ऑक्सिजन नाही, रेमडेसिव्हीरचे वितरण अत्यंत कमी होत आहे बाबत राज्याचे  पाणी पुरवठा मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील  यांना माजी आमदार तथा माजी पालकमंत्री डॉ.सतिष पाटील यांनी निवेदन देऊन लवकरात लवकर दोन्ही तालुक्यात निवेदनात दिलेल्या समस्यांचे निरसन करुन उपाय योजना अमलात आणण्यासाठी प्रयत्न करावे असे म्हटले आहे.

 

Protected Content