कोरोना बाधित रुग्णांसाठी मोफत जेवण पुरविणार – आ.किशोर पाटील

पाचोरा प्रतिनिधी । शहरासह ग्रामीण भागातही कोरोना बाधित रुग्ण आढळुन येत आहेत. तसेच शहरातील अनेक ठिकाणी खाजगी कोविड रुग्णालये कार्यरत असुन दोन ग्रामीण रुग्णालयाचे क्वारंटाइन सेंटर आहे. यामुळे कोरोना बाधित रुग्णांसाठी मोफत जेवणाची सुविधा आमदार किशोर पाटील यांच्यातर्फे आजपासून पुरविण्यात येत आहे.

सकाळी ८ ते १० वाजेपर्यंत गरजुंनी ७९७२३२९०९९ (किशोर बारावकर), ९७६६६३५३५५ (मुन्ना महाराज), ९४२१७१६२२४ (योगेश पाथरवट) या क्रमांकावर संपर्क करावा. अशी माहिती आमदार किशोर पाटील यांनी त्यांचे निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी नगराध्यक्ष संजय गोहील, शहर अध्यक्ष किशोर बारावकर, प्रविण ब्राम्हणे, स्वीय्य सहाय्यक राजेश पाटील, योगेश पाथरवट उपस्थित होते.

शहरात  ग्रामीण रुग्णालय, सुमनताई इन्स्टीट्यूट बांबरुड (महादेवाचे) असे दोन सरकारी कोरोन्टाईन सेंटर व   मंगलमूर्ती हाॅस्पीटल, साई कोविड हाॅस्पिटल, श्रीकृष्ण कोविड हाॅस्पीटल, विघ्नहर्ता हाॅस्पीटल, नवजीवन कोविड हॉस्पीटल, वृंदावन हाॅस्पीटल, आनंद हाॅस्पीटल, व्यंकट गोपाल हाॅस्पीटल, सिध्दीविनायक हाॅस्पीटल, सुदन कोविड हाॅस्पीटल, वेदांत हाॅस्पीटल, श्रीनिवास हाॅस्पीटल, संजीवनी कोविड हाॅस्पीटल, आशिर्वाद कोविड हाॅस्पीटल असे १४ खाजगी कोविड रुग्णालय असुन अनेक या रुग्णालयांमध्ये जे रुग्ण उपचार घेत आहेत त्यांचे साठी मोफत जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. 

आमदार किशोर पाटील यांनी पुढे बोलताना सांगितले की, सर्वत्र आॅक्सीजनचा भासत असलेला तुटवडा लक्षात घेता आमदार फंडातून पाचोरा ग्रामीण रुग्णालया लगत ५० लाख रुपयांचा आॅक्सीजन निर्मिती प्लाॅट व भडगाव ग्रामीण रुग्णालया लगत डी. पी. डी. सी. तुन ५० लाख रुपयांचा आॅक्सीजन प्लाटं महिनाभराच्या आत उभारण्यात येणार आहे. तसेच कोविड हाॅस्पीटल संदर्भात कोणास काही अडचण आल्यास छत्रपत शिवाजी महाराज चौकातील शिवसेना कार्यालयात संपर्क करुन आपल्या समस्यांचे निराकरण केले जाईल.

आमदार किशोर पाटील यांनी जनतेला व संबंधित डाॅक्टरांना आवाहन करत सांगितले की, ज्या कोरोना बाधित रुग्णाचा दुर्दैवाने मृत्यू झाल्यास नातेवाईकांनी सदरचा मृतदेह ताब्यात देण्याचा आग्रह करु नये.  कारण एखादी व्यक्ती चा कोरोना ने मृत्यू झाल्यास त्याचे मृतदेहा पासुन कोरोनाचा जास्त प्रमाणात फैलाव होतो. त्यामुळे नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात देण्याचा आग्रह करु नये.

 

Protected Content