नगरपालिकांच्या निवडणुकीचा वाजला बिगुल

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुकीचा बिगुल वाजला असून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन तसेच स्थानिक पातळीवर प्रभाग रचना प्रारूप आराखड्यास १० मार्च रोजी प्रसिद्धी देण्यात आली. प्रभाग रचना प्रारूप आराखड्यावर १७ मार्च अखेर हरकती सूचना मागविण्यात आल्या असल्यचे जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे.

जिल्ह्यातील १९ नगरपालिका, नगरपंचायतीअसून त्यापैकी १५ नगरपालिकांची पंचवार्षिक निवडणूक होऊ घातली आहे. यातील बहुतांश मुदत गेल्या वर्ष दीड वर्षापूर्वीच संपुष्टात आली आहे. परंतु गेल्या मार्च २०२० पासून संसर्ग प्रादुर्भाबामुळे या नगरपालिकांच्या निवडणुकीस वेळोवेळी मुदतवाढ देण्यात आली होती. गेल्या फेब्रुवारी महिन्यात राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार जिल्हा प्रशासनाकडून महिन्यात २०११ च्या लोकसंख्येनुसार प्रभाग रचना प्रारूप आराखडा मागविण्यात आला होता. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने विहित कार्यक्रमानुसार नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक प्राथमिक पातळीवर प्रभाग रचना, पभाग दर्शक नकाशे, स्थानिक नगरपालिका कार्यालयात नागरिकांसाठी खुले ठेवण्यात आले आहेत. या प्रा प्रभाग रचनेवर हरकती, सूचनांसाठी १७ मार्च दुपारी ३ वाजेपर्यंत स्थानिक नगरपालिका मुख्याधिकारी कार्यालयात अर्ज सादर करण्याची मुदत असल्याचे जिल्हा प्रशासनाने म्हटलें आहे.

निवडणुका वेळेतच आणि ओबीसी आरक्षणाशिवाय ?
राज्यात ओबीसी आरक्षणाचा मुद्दा प्रलंबित आहे. यासाठी राज्य सरकारने स्वतंत्र विधेयक देखील बहुमताने मंजूर करीत ओबीसी आरक्षणाशिवाय नगरपालिका, जिल्हा परिषदेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न घेण्याचे जाहीर केले होते, परंतु राज्य निवडणूक आयोगाने नियोजित कार्यक्रमानुसार जिल्ह्यातील १५ नगरपालिका सार्वत्रिक निवडणुक प्रक्रिया पूर्ववत ठेवत नगरपालिका प्रारूप प्रभाग रचना आराखडा प्रसिद्धी केली आहे. त्यामुळे नगरपालिका निवडणुका या वेळेतच आणि ओबीसी आरक्षणाशिवाय होतील असे संकेत आहेत. यापूर्वी जिल्ह्यात गेल्याच जानेवारी महिन्यात बोदवड नगरपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक दोन टप्प्यात ओबीसी आरक्षणाशिवाय पार पडली असून त्यावर शिवसेनेने सत्ता काबीज केली आहे.

Protected Content