पंजाबमध्ये आपच ‘बाप’ : झाडूच्या झंझावातासमोर सर्वच भुईसपाट !

चंदीगड-वृत्तसंस्था | पंजाब विधानसभेत सत्ताधारी कॉंग्रेससह भाजप, अकाली दल व माजी मुख्यमंत्री अमरिंदर यांच्या पक्षाला नाकारत मतदारांनी आम आदमी पक्षाला भरभरून प्रतिसाद दिल्याने तेथे आपची सत्ता येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

गेल्या काही महिन्यांपासून पंजाबमध्ये अतिशय नाट्यपूर्ण घटना घडल्या. यात कॉंग्रेसचे मुख्यमंत्री अमरिंदरसिंह यांना पक्षाने राजीनामा देण्यास भाग पाडल्याने ते नाराज झाले. त्यांनी मुख्यमंत्रीपदावरून पायउतार होताच निवडणुकीत स्वतंत्र लढण्याची घोषणा केली. तर कॉंग्रेसने चरणजीतसिंह चन्नी यांना धुरा सोपवली. मात्र चन्नी आणि सिध्द यांच्या गटात शेवटपर्यंत दिलजमाई झालीच नाही. तर दुसरीकडे भगवंत मान यांच्या नेतृत्वाखाली आम आदमी पक्षाने अतिशय अचूक असे नियोजन केले. याचेच फलीत म्हणून आज जाहीर करण्यात आलेल्या मतमोजणीत आपने दणदणीत असे यश संपादन केल्याचे दिसून आले आहे.

ताज्या कलानुसार ११७ सदस्यांच्या पंजाब विधानसभेत आम आदमी पक्षाला ८८ जागांवर आघाडी मिळाली असून २०१७ साली ७७ जागा मिळवणार्‍या कॉंग्रेसची ३१ जागांवर घसरण झाली आहे. अकाली दलास १८ तर भाजपला नऊ जागांवर समाधान मानावे लागले आहे.

दरम्यान, पंजाबमध्ये आपचे सरकार सत्तारूढ होणार असल्याचे स्पष्ट होताच या पदाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी प्रचंड जल्लोष करण्यास प्रारंभ केला आहे. भगवंत मान हे पंजाबचे मुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे.

Protected Content