लस, ऑक्सिजन , औषधांसोबत पंतप्रधानसुद्धा गायब ; राहुल गांधी यांची टीका

 

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । लस आणि ऑक्सिजनसोबत पंतप्रधान मोदीसुद्धा देशातून गायब आहेत असं ट्विट राहुल गांधी यांनी केलं आहे. “लस, ऑक्सिजन आणि औषधांसोबत पंतप्रधानसुद्धा गायब आहेत. उरलं आहे तर फक्त सेंट्रल विस्टा, औषधांवर जीएसटी आणि जिथे तिथे पंतप्रधानांचे फोटो”, असं  त्यांनी  म्हटलं आहे.

 

 

देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे आरोग्य व्यवस्था खिळखिळी झाली आहे. वाढत्या  रुग्णसंख्येमुळे आरोग्य सुविधांवर ताण येऊन त्या अपुऱ्या पडत   आहे. ऑक्सिजन आणि बेड्सची कमी असल्याचे काही दिवसापूर्वी पहायला मिळत होते.  देशात मोठ्या प्रमाणावर लसींचा तुटवडा निर्माण झाला आहे. केंद्राकडून लस पुरवठा होत नसल्याचा आरोप अनेक राज्यांनी केला आहे. लसीच्या कमतरतेमुळे अनेक राज्यांनी १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण बंद करण्याचा निर्णय घेतल आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या सर्वांवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. राहुल गांधी यांनी  लसींचा तुटवडा आणि सेंट्रल विस्टा प्रकल्पावरून पंतप्रधान मोदींना टीकेचे लक्ष्य केलं आहे.

 

 

राहुल गांधी यांच्यासह अन्य पक्षांनी देखील सेंट्रल विस्टा प्रकल्पावर खर्च करण्यात येणारा पैसा  आरोग्य व्यवस्थेसाठी वापरण्याचा सल्ला दिला होता.   औषधांवर जीएसटी कर न लावण्याची देेखील मागणी विरोधकांतर्फे करण्यात आली होती. यावर अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी  औषधे, लसी आणि ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स इत्यादी उपकरणांचा देशांतर्गत पुरवठा तसेच व्यावसायिक आयातीवरील वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) पूर्णत: माफ केल्यास त्या वस्तूंच्या किमती कमी होण्याऐवजी वाढतील असं सांगितले होते.

 

 

याआधी देखील काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि पक्षाच्या महासचिव प्रियंका गांधी वड्रा यांनी देशातील वाढत्या कोरोना संक्रमणावरुन आणि लसीकरणावरुन  केंद्र सरकारवर टीका केली होती. घरोघरी जाऊन लसीकरण केल्याशिवाय कोरोनासोबत लढणं अशक्य असल्यांच त्यांनी म्हटलं होतं.

Protected Content