पाचोरा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश

पाचोरा प्रतिनिधी । तात्यासाहेब आर. ओ. पाटील विज्ञान, वाणिज्य व कला कनिष्ठ महाविद्यालयाच्या १०० टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. सन २०२० – २१ या शैक्षणिक वर्षात इयत्ता १२ वी मध्ये ६ विदयार्थी प्रविष्ठ होते. सर्वच विदयार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. 

कु. चांदनी सुनिलकुमार दुसेजा हिने ९१.८३ टक्के गुण मिळवून महाविदयालयात प्रथम येण्याचा बहुमान मिळविला आहे. कु. पूर्वा प्रदीप महाजन हिने ८९ .७० टक्के गुण मिळवून व्दितीय आणि सानिका महाजन ८९ टक्के गुण मिळवून महाविदयालयात तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. या दैदीप्यमान यशाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा वैशाली सुर्यवंशी, सचिव नरेंद्रसिंग सुर्यवंशी, शालेय शिक्षण संचालक डॉ. भगवान सावंत, प्राचार्य प्रदिप सोनवणे उपप्राचार्य गणेश राजपूत, व प्रशासकीय अधिकारी संतोष पाटील यांनी सर्व यशस्वी विदयार्थ्यांचे तसेच त्यांना मार्गदर्शन करण्या-या सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले आहे. तसेच सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे परिसरातुन अभिनंदन व कौतुक केले जात आहे.

 

 

Protected Content