मालखेड्याजवळ झालेल्या अपघातात एक ठार; एक जखमी

पाचोरा (प्रतिनिधि) – पहुर येथुन पाचोरा शहरात लग्नसमारंभासाठी येत असतांना दुचाकीला ट्रक्टरने कट मारल्यामुळे मालखेडा या गावाजवळ झालेल्या अपघातात एक ठार तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना आज सकाळी 9 वाजेच्या सुमारास घडली. यातील जखमीस पाचोरा येथील खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. याबाबत पोलीसात अज्ञात वाहनचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पाचोरा शहरातील बाहेरपुरा भागात शाह बिरादरीच्या विवाह समारंभात येणाऱ्या पहुर येथील मयत शे.एजाज शे.नजमुद्दीन (३८) जखमी शे. शाबीर शे. युनुस दोघे राहणार पहुर ता. जामनेर यांचा मालखेडा जवळ आज २७ रोजी सकाळी 9 वाजता एका भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रक्टरने कट मारल्यामुळे दोघेही रस्त्याच्या कडेला फेकले गेले. अपघातानंतर दोघे जखमींना पाचोरा शहरातील विघ्नहर्ता मल्टीस्पेशल हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. शेख एजाज शेख नजमुद्दीन यांचा उपचार सुरू असतांनाच मृत्यू झाला तर शेख शाबीर शे. युनुस गंभीर असून उपचार सुरू आहेत.

मयत शे. एजाज शे. नजमुद्दीन यांना चार लहान मुले असून पहुर येथील माजी सरपंच इक्रामुद्दीन समोशद्दीन यांचा जवाई आहे. तर जखमी शे. शाबीर शे.युनुस हा वाकोद येथील सरपंच आलीमभाई यांचा भाचा आहे. या दोघांच्या अपघातामुळे लग्नाच्या मंडपात स्मशान शांतता झाली. हॉस्पिटल मध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.

Add Comment

Protected Content