‘हर घर झेंडा’ या उपक्रमांतर्गत लाचलुचपत विभागातर्फे सायकल रॅली

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जळगाव लाचलुचपत विभागाच्या वतीने हर घर झेंडा या उपक्रमांतर्गत जनजागृतीसाठी रविवारी ७ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजता काव्यरत्नावली चौक ते मेहरूण तलाव दरम्यान सायकल रॅली काढण्यात आली.

 

भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्ष होत असल्याने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जळगाव युनिटतर्फे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत १३ ऑगष्ट २०२२ ते १५ ऑगष्ट २०२२ या कालावधीमध्ये केंद्र शासनाच्या सूचनेनुसार हर घर झेंडा हा उपक्रम राबविणेबाबत व लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे कार्यप्रणाली व भ्रष्टाचाराचे निर्मूलन याची जनजागृती करण्यासाठी रविवारी ७ ऑगस्ट रोजी रोजी सकाळी ६ वाजता भाऊंचे उद्यान’ काव्यरत्नावली चौक ते मेहरूण तलावपर्यंत सायकल रॅली काढण्यात आली.

 

सायकल रॅली संपल्यानंतर तलावाजवळ लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याबद्दल व भ्रष्टाचार विरोधात जनजागृती करावी यासंदर्भात पोलीस उपधिक्षक शशिकांत पाटील यांनी मार्गदर्शन केले. आयोजित रॅलीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागचे पोलीस उपअधिक्षक शशिकांत पाटील,  पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव, पो.नि. एन.एन.जाधव यांच्यासह विभागाचे अधिकारी व कर्मचारी सहभागी होते.

 

Protected Content