रतन टाटा यांना वोकहार्ड फाउंडेशनचा जीवनगौरव पुरस्कार

 

मुंबई : वृत्तसंस्था ।  वोकहार्ड फाउंडेशनच्या वतीने नामवंत कॉर्पोरेट संस्थांना सामाजिक दायित्वासाठी ‘सीएसआर शायनिंग स्टार पुरस्कार’ प्रदान करण्यात आले. राजभवनात झालेल्या या सोहळ्यात  रतन टाटा यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित  करण्यात आले

 

 

कोरोनासारख्या कठीण काळात एकमेकांना सहकार्य केल्यास समाज आणि देश टिकून राहील, असा आशावाद राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी  पुरस्कार सोहळ्यात व्यक्त केला.

 

आरोग्य, स्वच्छता, पर्यावरण आणि अन्य क्षेत्रातील कार्यासाठी हे पुरस्कार वितरित करण्यात आले. पशु कल्याण क्षेत्रातील योगदानासाठी ओएनजीसी, बालकल्याणसाठी वेदांता लिमिटेड,  हिंदुस्थान युनिलिव्हर, दिव्यांग घटकांसाठी हिरो मोटोकॉर्प, शैक्षणिक क्षेत्रासाठी कलिंगा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, पर्यावरणासाठी अशोक लेलँड, आरोग्य क्षेत्रासाठी गेल (इंडिया), कौशल्य विकासासाठी लार्सन अँड टुर्बो, ट्रान्सजेंडर एम्पपॉवरमेंटसाठी एस्सार, पाणीपुरवठा व स्वच्छतेसाठी आयटीसी, महिला सबलीकरणासाठी आरईसी अशा संस्थांना गौरवण्यात आले.

 

वैयक्तिक विशेष योगदानाबद्दल डॉ. जितेंद्र जोशी, श्रीकांत बडवे आणि सुरज कुमार यांना तर उद्योग क्षेत्रातील विशेष योगदानाबद्दल कोटक महिंद्रा बँक यांना सन्मानित करण्यात आले. रतन टाटा यांच्या अनुपस्थितीत शंतनू नायडू यांनी पुरस्कार स्वीकारला. वोकहार्ड फाउंडेशनचे विश्वास्त हुजैफा खोराकीवाला आणि भारतीय विकास संस्थानचे अध्यक्ष डॉ. योगेश दुबे कार्यक्रमाला उपस्थित होते.

Protected Content