रेल्वे उड्डाणपुलावर विचित्र अपघात

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील नशिराबाद गावाजवळील रेल्वे उड्डाणपुलाजवळ भरधाव ट्रकने कारला दिलेल्या धडकेत कारचालक गंभीर जखमी झाले असून कारचे मोठे नुकसान झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शनिवारी १८ मार्च रोजी रात्री ८ वाजता ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील नशिराबाद गावानजीक असलेल्या रेल्वे उड्डाणपुलावरून लुकमान शहा मेहबुब शहा (वय-६३) रा. खडका रोड, मोहमदी नगर, भुसावळ हे गुरूवारी १६ मार्च रोजी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास त्याची कार क्रमांक (एमएच ३९ जे ५४३८) ने जात होते. त्यावेळी ट्रक क्रमांक (जीजे २७ टीटी ८९७७) आणि (एमएच ४६ बीयू २२७७)वरील चालकाने परिस्थीतीकडे दुलर्क्ष केल्याने पुलावरील डीव्हायडला धडक दिल्याने दोन्ही वाहने एकामेकांवर आदळले. त्यानंतर त्याची धडक लुकामन शहा मेहबुब शहा यांच्या कारला बसली. त्यात लुकमान शहा हे जखमी झाले शिवाय त्यांच्या कारचेही मोठे नुकसान झाले आहे. ही घटना घडल्यानंतर त्यांना खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, शनिवारी १८ मार्च रोजी त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ट्रकचालक शंकर वैजनाथ ढुबे रा. वरद ता. कल्याण जि.ठाणे याच्या विरोधात नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय जाधव करीत आहे.

Protected Content