नर्मदा परिक्रमाकार डॉ. नि. तु. पाटलांचा मुंबई आयएमएमार्फत गौरव

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | नर्मदा परिक्रमा यशस्वीपणे पूर्ण करणारे राज्यातील प्रथम आयएमए सदस्य तथा ख्यातनाम नेत्रतज्ज्ञ डॉ. नि. तु. पाटील यांना मुंबई पश्‍चीम आयएमएच्या वतीने सत्कार करण्यात आला.

डॉ. नि. तु. पाटील यांनी अतिशय खडतर समजली जाणारी नर्मदा परिक्रमा यात्रा ही यशस्वीपणे पूर्ण केली आहे. अशी कामगिरी पार पाडणारे ते राज्यातील प्रथम वैद्यकीय व्यावसायिक ठरले असून राज्य आयएएमने याला प्रमाणित केले आहे. या कामगिरीची दखल घेऊन त्यांचा ठिकठिकाणच्या इंडियन मेडिकल असोसिएशनच्या शाखांच्या मार्फत गौरव करण्यात येत आहे.

या अनुषंगाने मुंबई पश्‍चीम येथील आयएमएच्या शाखेने त्यांचा रविवारी हृद्य सत्कार केला. मॉं नर्मदा माता परिक्रमा यशस्वी पूर्ण झाल्याबद्दल आयएमए,मुंबई पश्चिम शाखेतर्फे आयएमए चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. शरद अग्रवाल, राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ.जयेश लेले, शाखा अध्यक्ष डॉ. शोभा आहुजा व सचिव डॉ. रश्मी मेहता यांच्या हस्ते सन्मान पत्र देण्यात आले.

Protected Content