जामनेर तालुक्यात विविध गावात छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन

जामनेर, लाईव्ह ट्रेंडस वृत्तसेवा । शहरासह तालुक्यातील विविध गावांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त प्रतिमापूजन करून अभिवादन करण्यात आले.

शहरातील वाकी रोडवरील छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठानतर्फे रात्री बारा वाजता शिव जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी मा जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराज यांचे सजीव आरास करण्यात आली होती. आमदार गिरीश महाजन यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांची आरती करण्यात आली. शिवजयंतीनिमित्त प्रतिष्ठानतर्फे शहरातून छत्रपती शिवाजी महाराज मावळ्यांची सजीव आरास करून ढोल ताशाच्या गजरात तरुण आणि पारंपारिक वेशभूषा परिधान करून मिरवणूक काढण्यात आली.

यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर श्याम चैतन्य महाराज, न.पा.उपनगराध्यक्ष प्रा.शरद पाटील, गटनेते डॉ.प्रशांत भोंडे, नगरसेवक सुहास पाटील, उल्हास पाटील, बाबुराव हिवराळे, छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष रवींद्र महाजन, उमेश पाटील, रमाकांत पाटील, प्रफुल्ल महाजन, गोलू महाजन यांच्यासह छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठानचे पदाधिकारी व कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जामनेर नगरपालिकेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा पूजन करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी आमदार गिरीश महाजन, नगराध्यक्षा साधना महाजन उपनगराध्यक्ष प्रा.शरद पाटील गटनेते डॉ.प्रशांत भोंडे, नगरसेवक चलते, महिंद्र बाविस्कर, बाबुराव हिवराळे, उल्हास पाटील, कैलास नरवडे, दीपक तायडे आदी. उपस्थित होते.

Protected Content