नसीरुद्दीन शाह यांच्या ‘त्या ट्विटबाबतच’ सत्य उघड

 

मुंबई, वृत्तसंस्था । ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी ट्विटरवरुन शेतकरी आंदोलनावर मत व्यक्त केले होते. यानंतर सोशल मीडियावर बराच गदारोळ उठला होता. या ट्विटबाबत त्यांच्या पत्नी रत्ना पाठक यांनी केलेल्या खुलास्याने सर्वाना धक्का बसला आहे. 

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेलं ट्विट नसीरुद्दीन शाह यांचं नसून त्यांचं कोणत ट्विटर अकाऊंटच नाहीये, असा खुलासा रत्ना पाठक यांनी केला आहे. तसंच शेतकरी आंदोलनावर नसिरुद्दीन यांनी भूमिका मांडली नाही. तर, ते ट्विट एका फेक अकाऊंटवरुन करण्यात आलं आहे. त्यामुळे प्रकरणी सायबर क्राइम सेलकडे तक्रार करण्यात आली आहे.

नसीरुद्दीन शाह यांच्या फेक अकाऊंटवरुन करण्यात आलेल्या ट्विटमध्ये त्यांनी शेतकऱ्यांची पाठराखण केली होती. तशीच बॉलिवूड कलाकारांवर टीकास्त्र डागलं होतं. शांत राहणं म्हणजे अन्याय करणाऱ्याला साथ देणं. जर शेतकऱ्यांना पाठिंबा दिला तर आपलं खूप मोठं नुकसान होईल, असं बॉलिवूडमधील काही जणांना वाटत आहे. पण, त्यांनी इतकं कमावून ठेवलंय की त्यांच्या पुढील सात पिढ्या आरामात बसून खातील. त्यामुळे त्यांनी नेमकी भूमिका घ्यावी, असं त्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

 

Protected Content