आगार व्यवस्थापकांच्या वर्षपूर्तीनिमित्त कर्मचार्‍यांतर्फे सत्कार

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील एसटी आगारातील आगार व्यवस्थापक दिलीप महाजन या कर्तव्यदक्ष अधिकारी यांना एक वर्ष सेवापूर्ण झाल्या नित्ताने यावल आगारातील कामगार बंधू व भगिनी यांच्या वतीने त्यांना सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्यात.

 

आगार व्यवस्थापक दिलीप महाजन यांच्या सेवावर्ष पुर्तीच्या निमित्ताने त्यांचा कर्मचार्‍यांनी गौरव केला. एसटी आगारात मागील एक वर्षाच्या कार्यकाळात उत्कृष्ट कामगिरी  पार पडणारे व सर्व कामगारांना सोबत घेऊन आपले आगार कसा उंच शिखरावर न्यावा हे सर्व आगार स्थापका कडून खरोखरच शिकायला पाहिजे..अशी भावना सहकारी कर्मचारी यांनी व्यक्त केली. सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे यावल आगारात कायम भेडसावणार्‍या पाण्याचा प्रश्न कायमचा मिटला यात महामंडळा च्या वरिष्ठ अधिकारी व कामगार बंधू व भगिनी यांचे सुद्धा श्रेय लाभले.

 

त्यातूनच अजून दुसरे विशेष असे की स्व.बाळासाहेब ठाकरे स्वच्छता अभियान योजना राबवितांना परिसरातील स्वयंसेवक यांच्या कडून त्यांना विनंती करून यावलच्या बस स्थानकाची सुंदर अशी रंगरंगोटी करून सुधारणा करीत बसस्थानकाचा कायापालट केला…त्यात सुद्धा आपल्या यावल आगाराला चांगले गुण मिळाल्याचे आगारप्रमुखांनी आवर्जून नमूद केले.

 

याप्रसंगी दिलीप महाजन यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना असेच येणार्‍या पुढील काळात आपण सर्वांनी चिकाटीने महामंडळ आणि प्रवासी हिताच्या दृष्टीने कर्तव्य करीत आपण आपला यावल आगार उंच शिखरावर पोहोचवू या.. अशी अपेक्षा त्यांनी आपल्या सर्व सहकार्‍यांकडून व्यक्त केली .

Protected Content